विप्रशापाच्या निमित्ताने यादवकुलाचा नाश, उद्धवजींना परमार्थ मार्ग निवेदन, अवतार समाप्ति इत्यादि विषय अकराव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
चतुर्विध प्रलय, राजर्षि परीक्षिताचा देहत्याग, मार्कंडेयांचं चरित्र, तंत्रपूजाविधी, सूर्यनारायणांबद्दल माहिती हे सगळे विषय बाराव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत माणूस सापडलेला असला. धर्म भ्रष्ट झालेला आहे, संकटग्रस्त झालेला आहे, अशावेळी "हरये नमः' असे शब्द जर त्याच्या मुखातून बाहेर पडले तर सर्व पातकांपासून तो मुक्त होतो. भगवंताच्या लीला श्रवण करणं, भगवंताचं अखंड स्मरण राहाणं याद्वारे सर्व पातकांचा क्षय होतो. वासनानाश होतो आहे. सत्व शुद्ध होतं आहे. भगवद्भक्ती उत्पन्न होते, वैराग्य उत्पन्न होतं, ज्ञानविज्ञान सर्वही प्राप्त होतं. ऋषि महाराज आपण खरोखर भाग्यवान आहात. भगवंताचं अखंड स्मरण आपल्याला आहे. सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने आपली चालू आहेत. आपण विचारल्यामुळे मला या चरित्राचं स्मरण झालं आणि मी आपल्याला सांगितलं. कलीचे दोष दूर करण्याकरता भगवान श्रीहरीची कथा श्रवण करावी, गायन करावी, चिंतन त्याचं करावं, सर्व ब्रह्मांडांतले देव ज्याचं चिंतन करताहेत त्या सर्वात्मा श्रीहरीला मी प्रणाम करतो आहे. नेहमी समाधी अवस्थेत मग्न असतानासुद्धा शुक्राचार्यांनी आपल्या पिताश्रींनी रचलेल्या या भागवतपुराणाचा प्रसार सर्वांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या दुरितक्षयाकरता केला हे मोठे उपकार त्यांचे मानव समाजावर आहेत. त्या शुक्राचार्यांनाही माझा नमस्कार असो अशी प्रार्थना शेवटी सूत महर्षींनी केलेली आहे.
पुढं अष्टादश पुराणांचं वर्णन केलेलं आहे. त्यांची संख्या वगैरे सांगितलेली आहे. नारदांच्या आदेशाप्रमाणे व्यास महर्षींनी या भागवत पुराणाची रचना केलेली आहे हे नवीन केलं असं नाही. ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्यापासून विस्तार केलेला आहे. या दिव्य भागवत पुराणामध्ये वैराग्यपूर्ण, भक्तीपूर्ण आख्यानं आहेत. सर्व वेदांताचं हे सार आहे. कैवल्यफल देणारं आहे. अद्वितीय जी आत्मवस्तू याचं प्रतिपादन यात केलेलं आहे.
कस्मै येन विभासितोऽयमतुलो ज्ञानदीपः पुरा
तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा ।
योगीन्द्राय तदात्मनाथ भगवद्राताय कारुण्यतः
तच्छुद्धं विमलं विशोक ममृत्तं सत्यं परं धीमहि ।।
12.13.19 ।। श्री. भा.
शेवटी उपसंहार करताहेत, वेदव्यास महर्षि. आरंभालाही "सत्यं परं धीमहि' त्या भगवंताचं ध्यान केलं, शेवटीही केलं. हा जो ज्ञानदीप आहे हा भगवंतानेच ब्रह्मदेवांकडे दिला. ब्रह्मदेव हे देखील भगवत्स्वरूपच आहेत. त्यांच्याकडून हा ज्ञानदीप नारदांकडे आला. त्यांच्याकडून व्यासांना आणि व्यासांकडून शुक्राचार्यांकडे हा ज्ञानदीप आलेला आहे. परीक्षित राजाच्या निमित्ताने तो सर्व समाजाला मिळालेला आहे. परंपराही अशी आहे. भगवंताची आहे. तेच श्रोते आणि तेच वक्ते. गुरुशिष्य रूप तेच भगवन आहेत. असं जे काही सत्यस्वरूप अबाधित आहे. त्याच आम्ही चिंतन करतो. असं ध्यान भगवंताचं केलं आणि शेवटी व्यास महर्षींनी भगवंताजवळ प्रार्थना केलेली आहे.
भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते ।
तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो ।।
12.13.22 ।। श्री. भा.
प्रत्येक जन्मामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आपली भक्ती असो. म्हणजे सगळं आम्हाला मिळेल.
नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् ।
प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् ।।
12.13.23 ।। श्री. भा.
ज्या भगवंताचं नामसंकीर्तन श्रद्धेने घडलं असता सर्वही पातकांचा नाश होतो. ज्याला प्रणाम केलेला असताना सर्व दुःखांची निवृत्ती होते. त्या भगवान श्रीहरि सर्वेश्वर याला आमचा नमस्कार असो. अशी प्रार्थना करून श्रीमद्भागवत ग्रंथाची समाप्ती वेदव्यासांनी केलेली आहे.
भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते ।
तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो ।। 12.13.22 ।। श्री. भा.
नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् ।
प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् ।। 12.13.23 ।। श्री. भा.
हरये नमः हरये नमः हरये नमः
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ।। 11.2.36 ।। भा.
जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि ।
दयित दृश्यतां दिक्षु तावका - स्त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते ।। १ ।।
शरदुदाशये साधुजातसत् सरसिजोदरश्रीमुषा दृशा ।
सुरतनाथ तेऽशुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वधः ।। २ ।।
विषजलाप्ययाद् व्यालराक्षसाद् वर्षमारुताद् वैद्युतानलात् ।
वृषमयात्मजाद् विश्वतोभयादृषभ ते वयं रक्षिता मुहुः ।। ३ ।।
न खलु गोपिकानन्दनो भवानखिलदेहिनामन्तरात्मदृक् ।
विखनसार्थितो विश्वगुप्तये सख उदेयिवान् सात्वतां कुले ।। ४ ।।
विरचिताभयं वृष्णिधुर्य ते चरणमीयुषां संसृतेर्भयात् ।
करसरोरुहं कान्त कामदं शिरसि धेहि नः श्रीकरग्रहम् ।। ५ ।।
व्रजजनार्तिहन् वीर योषितां निजजनस्मयध्वंसनस्मित ।
भज सखे भवत्किंकरीः स्म नो जलरुहाननं चारु दर्शय ।। ६ ।।
प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनम् ।
फणिफणार्पितं ते पदाम्बुजं कृणु कुचेषु नः कृन्धि हृच्छयम् ।। ७ ।।
मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण ।
विधिकरीरिमा वीर मुह्यतीरधरसीधुनाऽऽप्याययस्व नः ।। ८ ।।
तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहम् ।
श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः ।। ९ ।।
प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलम् ।
रहसि संविदो या हृदिस्पृशः कुहक नो मनः क्षोभयन्ति हि ।। १० ।।
चलसि यद् व्रजाच्चारयन् पशून् नलिनसुन्दरं नाथ ते पदम् ।
शिलतृणाङ्कुरैः सीदतीति नः कलिलतां मनः कान्त गच्छति ।। ११ ।।
दिनपरिक्षये नीलकुन्तलैर्वनरुहाननं बिभ्रदावृतम् ।
घनरजस्वलं दर्शयन् मुहुर्मनसि नः स्मरं वीर यच्छसि ।। १२ ।।
प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डनं ध्येयमापदि ।
चरणपङ्कजं शंतमं च ते रमण नः स्तनेष्वर्पयाधिहन् ।। १३ ।।
सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुष्ठु चुम्बितम् ।
इतररागविस्मारणं नृणां वितर वीर नस्तेऽधरामृतम् ।। १४ ।।
अटति यद् भवानह्नि काननं त्रुटियुगायते त्वामपश्यताम् ।
कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षतां पक्ष्मकृद् दृशाम् ।। १५ ।।
पतिसुतान्वयभ्रातृबान्धवानतिविलङ्घ्य तेऽन्त्यच्युतागताः ।
गतिविदस्तवोद्गीतमोहिताः कितव योषितः कस्त्यजेन्निशि ।। १६ ।।
रहसि संविदं हृच्छयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणम् ।
बृहदुरः श्रियो वीक्ष्य धाम ते मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः ।। १७ ।।
व्रजवनौकसां व्यक्तिरङ्ग ते वृजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलम् ।
त्यज मनाक् च नस्त्वत्स्पृहात्मनां स्वजनहृद्रुजां यन्निषूदनम् ।। १८ ।।
यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु भीताः शनैः प्रिय दधीमहि कर्कशेषु ।
तेनाटवीमटसि तद् व्यथते न किंस्वित् कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः ।। १९ ।।
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतं नामैकत्रिंशोऽध्यायः ।। ३१ ।।
आरती निगम वृक्ष सारा ।। भागवत संज्ञा भव पारा ।। धृ. ।।
नारद कथा साधु श्रवणी, परिक्षिती लागला शुकचरणी ।।
विरागे तनुत्यागे करुनि, कथी अवतार कथा भरणी ।।
चाल :- विदुर मैत्रेय संग घडला ।। विधी अति कष्टी ।।
निजवी सृष्टी ।। सुखाची वृष्टी ।। कपिलमुनी देवहूतीदारा ।।
दुरात्म सूकर अवतारा ।। १ ।। आरती निगम ....
ब्रह्मसुत दक्षवंश यागी ।। आला ध्रुव तपे अचल भागी ।।
पृथु प्राचीन बर्हिरागी ।। प्रियव्रत वनवासा त्यागी ।।
चाल :- मही आकाश गोल वदला ।। नरक भय हरुनि ।।
अजामिळ तरुनि ।। बोध बहु करुनि ।। चित्रकेतू नेई पैलपारा ।। काश्यप संति सुखधारा ।। २ ।।
आरती निगम ....
भक्त प्रल्हादभये तरला ।। हरी नरहरी रूप नटला ।।
नक्रापासुनि करी सुटला ।। समुद्र मथुनि बळी पिटला ।।
चाल :- कूर्ममोहिनी भिषगराया ।। रवेशशी गोत्र ।।
अजित नृप पात्र ।। अमित युग पात्र ।। कृष्ण भक्तीने अकूपारा ।।
नवम हा संपविला सारा ।। ३ ।। आरती निगम ....
कंस चाणूर मुख्य वरा ।। दमाया अवतरला वरा ।।
गोकुळी लीला करू शकला ।। साहाय्य झाला अर्जुनाला ।।
चाल :- उद्धवा ज्ञान कथा बोधी ।। प्रलय युग विलय ।।
परिक्षिती सुनय ।। मृकंडु तनया पावला हरिचरणी थारा ।।
विठ्ठल वेद स्कंद बारा ।। ४ ।। आरती निगम वृक्ष सारा ।। भागवत संज्ञा भवपारा ।।
आरती दत्तराजयाची ।। धुंडिराजसुपुत्राची ।। धृ. ।।
पुण्यग्रामी तूं वससी ।। भक्तां पावन तूं करशी ।।
भजती त्यांते उद्धरशी ।। न भजती त्यांहि कृपा करशी ।।
(चाल) पुरुषोत्तमा तूं अवतारा ।।
शरण येऊन, विनीत होऊन, धूली घेईन ।।
श्रीगुरू आपुल्या चरणाची ।। किमया पावन करण्याची ।।
आरती दत्तराजयाची ।। धुंडिराजसुपुत्राची ।। १ ।।
भागवतावरी तव प्रीति ।। स्वकुळी गणेशदत्तभक्ती ।।
ज्ञानी विद्यावाचस्पति ।। अंकित कुंडलिनी शक्ती ।।
(चाल) कवीश्वरा तूं ईश्वरा ।।
जगती प्रगटून, लीला दावून, तरीही लपवून ।।
ठेविली ओळख स्वरूपाची ।। गाईन लीला किर्तीची ।।
आरती दत्तराजयाची ।। धुंडिराजसुपुत्राची ।। २ ।।
शुभ्र वस्त्रे शुचिमैं ल्याले ।। वात्सल्या मूर्त रूप आले ।।
ज्ञाना विनयैं शोभविले ।। ब्रह्म साकारूनि आले ।।
(चाल) भक्तवत्सला दयाघना ।।
दृष्टीनें करून, मजला बघून, जवळी घेऊन ।।
वर्षाव करी बा ममतेची ।। मागिन भिक्षा भक्तीची ।।
आरती दत्तराजयाची ।। धुंडिराजसुपुत्राची ।। ३ ।।